आयपीएलच्या सतराव्या हंगामापूर्वी महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधारपदावरुन पायउतार झाला, आणि चेन्नईची कमान ऋतुरजा गायकवाडकडे सोपवण्यात आली

चेन्नईच्या कर्णधारपदी ऋतुराजलाच का संधी देण्यात आली? याचा खुलासा सीएसकेचे बॅटिंग कोच मायकल हसी यांनी केला आहे.

ऋतुराज गायकवाडला कर्णधारपद सोपवण्याच्या निर्णयामुळे आपल्याला आश्चर्याचा धक्का बसला, असं मायकल हसीने म्हटलं आहे.

वास्तविक कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर खुद्द एमएस धोनीनेच संघाचं नेतृत्व यापुढे ऋतुराज गायकवाड करेल असं टीम मॅनेजमेंटला सांगितलं

धोनीने कर्णधारपदासाठी ऋतुराजचं नाव समोर केल्याने सुरुवातीला सर्वांनाच आश्चर्य वाटलं. पण त्यानंतर धोनीचा निर्णय सर्वांनी मान्य केला, असं हसीने म्हटलंय.

मैदानावर मेंटॉर म्हणून एमएस धोनीने ऋतुराजची खूप मदत केली आहे. मुख्य प्रशिक्षक स्टीफन प्लेमिंगनेही ऋतुराजचा चांगल्या पद्धतीन सांभाळून घेतल्याचंही हसीने सांगितलं.

ऋतुराजच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने यंदाच्या आयपीएल हंगामात 13 पैकी 7 सामन्यात विजय मिळवलाय. चेन्नई पॉईंटेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. 18 मे रोजी चेन्नईचा ग्रुपमधला शेवटचा सामना असेल.

VIEW ALL

Read Next Story