येत्या 22 मार्च पासून इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनला सुरुवात होणार असून यात 10 संघ विजेतेपदाची ट्रॉफी जिंकण्यासाठी भिडणार आहेत.
मुंबई इंडियन्सने कर्णधार म्हणून यंदाच्या वर्षी देखील हार्दिक पंड्याला कायम ठेवलं आहे.
लखनऊ सुपर जाएंट्सने ऑक्शनमधून तब्बल 27 कोटींना विकेत घेतलेल्या ऋषभ पंतकडे नेतृत्व सोपवलं आहे.
चेन्नई सुपरकिंग्सने यंदा पुन्हा एकदा ऋतुराज गायकवाडला कर्णधार पदाची जबाबदारी दिली आहे.
गुजरात टायटन्सने यंदा कर्णधार म्हणून शुभमन गिल यालाच कायम ठेवलं आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने कर्णधार म्हणून यंदा रजत पाटीदारची निवड केली आहे.
गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सने कर्णधार म्हणून अजिंक्य रहाणे त्याच्यावर जबाबदारी सोपवली आहे.
पंजाब किंग्सने श्रेयस अय्यरकडे संघाचं नेतृत्व सोपवलंय.
राजस्थान रॉयल्सने कर्णधार म्हणून संजू सॅमसनला यंदाही कायम ठेवलं आहे.
सनरायजर्स हैदराबादने पॅट कमिन्सच्या नेतृत्वात आयपीएल 2024 मध्ये उत्तम प्रदर्शन केलं होतं. तेव्हा यंदा सुद्धा कमिन्सवरतीच जबाबदारी देण्यात आली आहे.
दिल्ली कॅपिटल्सने अक्षर पटेलकडे संघाचं नेतृत्व सोपवलं आहे.