जसप्रित बुमराह टीम इंडियाचा हुकूमाचा एक्का आहे.
सध्या तो मुंबई इंडियन्स संघातून खेळताना दमदार बॉलिंग करतोय.
जसप्रित बुमराहला खेळणं हे प्रत्येक बॅट्समनसाठी आव्हानात्मक असतं.
जसप्रितच्या ओव्हरला बॅट्समन स्वत:ची विकेट्स वाचवत असतात, त्यामुळे जास्त रन्स होण्याची शक्यता फार कमी असते.
आयपीएलमध्ये जसप्रित बुमराहच्या ओव्हरला सर्वाधिक स्कोअर करणाऱ्या बॅट्समन्सबद्दल जाणून घेऊया.
जसप्रित बुमराहने आयपीएलच्या एका ओव्हरमध्ये सर्वाधिक 26 रन्स दिलेयत.
पॅट कमिस, ड्वेन ब्रावो, करुण नायर आणि फाफ ड्युप्लेसिसने बुमराहविरोधात जास्त धावा केल्या आहेत.
पॅट कमिसने आयपीएल 2022 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना बुमराहविरोधात 26 रन्स केले.
ड्वेन ब्राव्होने 2018 मध्ये चेन्नईतून खेळताना 20 रन्स केले.
करुण नायरने 2025 मध्ये दिल्लीकडून खेळताना जसप्रितच्या एका ओव्हरमध्ये 18 रन्स केले.
फाफ ड्युपलिसने 2021 मध्ये चेन्नईकडून खेळताना बुमराहच्या एका ओव्हरमध्ये 17 रन्स केले.