IPL मधून खेळाडूच नाही तर चिअरलिडर्सही करतात बक्कळ कमाई, आकडा ऐकून धक्का बसेल

Pooja Pawar
Mar 18,2025


क्रिकेट स्पर्धेत चिअरलिडर्स आणि त्यांचा डान्स आकर्षणाचा विषय ठरतो. मात्र या चिअरलिडर्सना मॅचमध्ये परफॉर्म करण्यासाठी किती पैसे मिळतात याविषयी जाणून घेऊयात.


आयपीएलमध्ये प्रत्येक संघाचा चिअरलिडर्सना वेगवेगळी सॅलरी मिळते. त्यामुळे या जगातील सर्वात मोठ्या टी 20 लीगमधून फक्त खेळाडूच नाही तर चिअर लीडर्स सुद्धा बक्कळ कमाई करतात.


मीडिया रिपोर्ट्सनुसार चिअरलिडर्सना प्रत्येक सामन्यासाठी जवळपास 14 हजार ते 24 हजार एवढे पैसे मिळतात.


केकेआरच्या चिअरलिडर्सना जवळपास 24 हजार रुपयांचे मानधन दिले जाते. ही रक्कम बाकी संघांच्या तुलनेत सर्वात जास्त आहे.


मुंबई इंडियन्स आणि आरसीबीच्या चिअरलिडर्सना 20 हजार रुपये प्रति सामने दिले जातात.


चिअरलिडर्सना फिक्स सॅलरी ऐवजी संघाच्या विजयानंतर बोनस सुद्धा दिला जातो. शिवाय त्यांच्या राहण्यासाठी आणि खाण्यासाठी चांगली सुविधा सुद्धा दिली जाते.

VIEW ALL

Read Next Story