IPL Mega Auction 2025: 'या' पाच खेळाडूंवर लागू शकते करोडोंची बोली!

तेजश्री गायकवाड
Nov 24,2024


IPL 2025 साठी मेगा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी होणार आहे, ज्यामध्ये अनेक मोठ्या खेळाडूंवर बोली लावल्या जाऊ शकतात.


लिलावासाठी अनेक मोठी नावे रिंगणात असतील, ज्यावर संघ 20 कोटी रुपये खर्च करू शकतात.

मोहम्मद शमी

दुखापतीमुळे 2024 चा सीजन न खेळल्यानंतर आता शमी या दुखापतीतून सावरला असून सध्या तो टीम इंडियाच्या प्रमुख गोलंदाजांपैकी एक आहे. अशा परिस्थितीत संघ शमीवर 20 कोटी रुपये खर्च करू शकतात.

जोस बटलर

इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर आयपीएल २०२४ पर्यंत राजस्थान रॉयल्सचा भाग होता. यावेळी त्याला विकत घेण्यासाठी संघ २० कोटी रुपये खर्च करण्यास तयार असू शकतात.

श्रेयस अय्यर

अय्यरच्या नेतृत्वाखाली, केकेआरने आयपीएल 2024 चे विजेतेपद जिंकले, त्यानंतर फ्रँचायझीने त्याला सोडले. अशा परिस्थितीत मेगा लिलावात त्यांना 20 कोटी रुपयांपर्यंत किंमत मिळण्याची शक्यता आहे.

केएल राहुल

गेल्या सीजननंतर लखनऊ सुपर जायंट्सचे नेतृत्व सोडल्यानंतर केएल राहुलला आता 20 कोटी रुपयांपर्यंत किंमत मिळू शकते.

ऋषभ पंत

ऋषभ पंतसाठी संघ २० कोटी रुपये खर्च करण्यास तयार असू शकतात. IPL 2025 मध्ये पंत सर्वात महागडा विकणारा खेळाडू देखील बनू शकतो.

VIEW ALL

Read Next Story