रोहित शर्मा IPL चा नवा 'सिक्सर किंग', अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय बॅटर

Pooja Pawar
May 30,2025


आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज रोहित शर्माने तुफान फटकेबाजी करून नवा रेकॉर्ड नावावर केला आहे.


रोहित शर्माने एलिमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध 50 बॉलमध्ये 81 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने 9 चौकार आणि 4 षटकार ठोकले.


रोहित शर्माने हे 4 षटकार (Sixs) ठोकताच त्याने आयपीएलमध्ये 300 षटकारांचा टप्पा पार केला असून यासच मोठा विक्रम आपल्या नावे नोंदवला आहे.


रोहित शर्मा आयपीएलमध्ये सर्वाधिक 300 हुन अधिक षटकार ठोकणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने आतापर्यंत आयपीएल सामन्यात 302 षटकार ठोकले आहेत.


रोहित शर्माच्या खालोखाल या लिस्टमध्ये 291 षटकारांसह विराट कोहली तर 264 षटकारांसह एम एस धोनी आहे.


आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा रेकॉर्ड विदेशी खेळाडू ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने आयपीएलमध्ये 357 षटकार ठोकले आहेत.

VIEW ALL

Read Next Story