IPL 2025 : ना हार्दिक, ना रोहित... मुंबई इंडियन्समधील सर्वात महागडा खेळाडू कोणता?

Pooja Pawar
Mar 26,2025


मुंबई इंडियन्स हा आयपीएल 2025 मधील सर्वात यशस्वी संघ असून त्यांनी तब्बल 5 वेळा स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे.


आयपीएलमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटर्सना आयपीएलमध्ये विविध संघांकडून खेळण्यासाठी भरपूर पैसे मिळतात. तेव्हा मुंबईने आयपीएल 2025 साठी करारबद्ध केलेला सर्वात महागडा खेळाडू कोणता याविषयी जाणून घेऊयात.

जसप्रीत बुमराह :

जसप्रीत बुमराह हा मुंबई इंडियन्सचा सर्वात महागडा खेळाडू आहे. मुंबईने आयपीएल 2025 मेगा ऑक्शनपूर्वी त्याला तब्बल 18 कोटींना रिटेन केले.

सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या :

सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या या दोघांना मुंबई इंडियन्सने आयपीएल 2025 साठी प्रत्येकी 16.35 कोटींना रिटेन केले.

रोहित शर्मा आणि तिलक वर्मा :

मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माला मुंबईने 16.35 कोटींना रिटेन केले तर युवा खेळाडू तिलक वर्मा याला 8 कोटींना रिटेन करण्यात आले.

ट्रेंट बोल्ट :

आयपीएल 2025 मेगा ऑक्शनमधून मुंबई इंडियन्सने खरेदी केलेला ट्रेंट बोल्ट हा सर्वात महागडा खेळाडू होता, त्याच्याकरता मुंबईने 12.50 कोटी रुपये खर्च केले.

दीपक चहर :

स्टार गोलंदाज दीपक चहर याला मुंबई इंडियन्सने ऑक्शनमधून 9.25 कोटींना खरेदी केलं.


विल जॅक आणि नमन धीर यांना मुंबई इंडियन्सने प्रत्येकी 5.25 कोटींना विकत घेतले.

VIEW ALL

Read Next Story