क्रिकेट हा जगभरातील दुसरा सर्वात प्रसिद्ध खेळ आहे. भारतातील शहरांच्या गल्या गल्यांमध्ये मुलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात.
मात्र जगात एक असं शहर आहे जिथे क्रिकेट खेळण्यावर बंदी घालण्यात आलीये. मात्र या मगच नेमकं कारण काय याविषयी जाणून घेऊयात.
इटली येथील मोनफालकोन (Monfalcone) शहरात क्रिकेटवर बंदी घालण्यात आली आहे.
मोनफालकोन शहरात कोणी क्रिकेट खेळताना आढळल्यास त्याला 100 युरो म्हणजेच सुमारे 9200 रुपये इतका दंड ठोठावण्याची तरतूद करण्यात आली आहे.
या बंदीच पालन होत आहे की नाही यासाठी पोलिस शहरातील सर्वच प्रमुख मैदानं, रस्ते, गल्ल्या, गार्डन इत्यादी सर्व ठिकाणी सीसीटीव्हीद्वारे नजर ठेऊन असतात.
इटालियन शहर मोनफाल्कोनची एकूण लोकसंख्या 30 हजार आहे. यापैकी एक तृतीयांश लोकसंख्या ही परदेशी स्थलांतरित आहेत, ज्यापैकी बहुतेक बांगलादेशी मुस्लिम आहेत. बांगलादेशात क्रिकेट जास्त खेळले जाते. बांगलादेशी 1990 च्या दशकात क्रूझ जहाजे बांधण्यासाठी मजूर म्हणून येथे आले होते. हळूहळू त्यांची लोकसंख्या वाढत गेली.
बांगलादेशी मुस्लिम हे शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा करू लागले आणि क्रिकेट खेळू लागले. यामुळे मोनफाल्कोन शहरातील स्थानिक लोकांमध्येभिति निर्माण झाली की हा लोक असेच येत राहतील आणि यामुळे शहराची सांस्कृतिक ओळख धोक्यात येईल.
यामुळेच इथल्या महापौरांनी शहरात क्रिकेट खेळण्यावर बंदी आणली. याचा वापर बांगलादेशी मुस्लिमांच्या विरोधाचे प्रतीक म्हणून करण्यात आला.