वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचं 'यॉर्करस्त्र' तयार
बुमराहच्या नेतृत्वाखाली आयर्लंडविरुद्धची मालिका भारताने देखील खिशात घातली. या सामन्यात बुमराहने 2 विकेट घेतल्या. त्यावेळी बुमराहने नवा इतिहास रचला आहे.
जसप्रीत बुमराह टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक बळी घेणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे.
यझुवेंद्र चहलने आत्तापर्यंत 80 सामन्यात 96 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. शतकापासून तो केवळ 4 विकेट लांब आहे.
गेल्या अनेक काळापासून क्रिकेटपासून लांब असलेल्या भुवनेश्वर कुमारने 87 सामन्यात 90 विकेट घेतल्या आहेत.
तर बुमराहने आता या यादीत तिसऱ्या क्रमांकावर मजल मारली आहे. त्याने 62 सामन्यात 74 विकेट्स घेतल्या आहेत.
बुमराहने हार्दिक पांड्याला मागे टाकलंय. पांड्याने आत्तापर्यंत 73 विकेट घेतल्या आहेत. 92 सामन्यात त्याने हा पराक्रम गाजवलाय
दरम्यान, आयर्लंडविरुद्ध भारताचं 'यॉर्करस्त्र' चालल्याने आता आगामी आशिया कप आणि वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माचं टेन्शन संपल्याचं पहायला मिळतंय.