जसप्रीत जसबीरसिंग बुमराह असं त्याचं पूर्ण नाव. टीम इंडियामध्ये तो उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे.
बुमराहचा जन्म गुजरातमधील अहमदाबाद येथे एका शीख कुटुंबात झाला.
बुमराहच्या वडिलांचं नाव जसबीर सिंग आणि आईचं दलजीत बुमराह. वयाच्या पाचव्याच वर्षी त्यानं वडिलांना गमावलं.
बुमराह रणजीमध्ये गुजरातच्या संघाकडून प्रथम श्रेणी क्रिकेट (First Class Cricket) खेळला.
वयाच्या 19 व्या वर्षी बुमराहने IPL मध्ये पदार्पण करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध 3/32 अशी धडाकेबाज गोलंदाजी केली होती.
वयाची तिशी ओलांडण्यापूर्वी जसप्रीत बुमराहची एकूण संपत्ती 55 कोटी रुपये आहे.
बुमराह ताशी 142 किमी इतक्या तूफान वेगानं गोलंदाजी करतो.
ICC कसोटी गोलंदाजी क्रमवारीत एकूण 756 गुणांसह तो 10 व्या स्थानावर, आयसीसी ODI मध्ये 685 गुणांसह चौथ्या स्थानावर आणि ICC T20 गोलंदाजी क्रमवारीत एकूण 391 गुणांसह 81 व्या स्थानावर आहे.
जसप्रीत बुमराह सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये गुजरात आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघातून खेळतो