न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला खेळवली जातीये.
पहिल्या कसोटी सामन्यात कर्णधार केन विल्यमसनने धमाकेदार शतक ठोकलं. त्यामुळे त्याने साऊथ अफ्रिकेला बॅकफूटवर पाठवलंय.
केन विल्यमसनने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 30 वं शतक ठोकलं. या शतकासह केनने कसोटीत रेकॉर्डब्रेक कामगिरी केली.
केन विल्यमसन कसोटीत सर्वाधिक शतकं ठोकण्याच्या बाबतीत विराट कोहलीच्या पुढे गेलाय. 97 सामन्यात केनने ही कामगिरी केलीये.
विराट कोहलीने आतापर्यंत कसोटीत 29 शतकं झळकावली आहेत. 113 सामन्यात विराटने 29 शतकं ठोकली आहेत.
तर केन विल्यमसनने सर डॉन ब्रॅडमन यांना देखील मागे टाकलंय. ब्रॅडमन यांनी 52 सामन्यात 29 सेंच्यूरी झळकावल्या होत्या.