जखमी असल्याने केएल राहूल जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधून (WTC) बाहेर पडला आहे. त्यामुळे आता राहूलच्या जागेवर कोणाला संधी मिळणार? यावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
केएल राहूल जखमी झाल्याने लखनऊ सुपर जायंट्स संघाची जबाबदारी कृणाल पांड्या याच्या खांद्यावर सोपवली होती. त्यामुळे आता कृणाल लखनऊसाठी पूर्णवेळ कॅप्टन्सी करेल का? असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.
लखनऊच्या कॅप्टन्सीसाठी मार्कस स्टॉयनिस याच्या नावाची चर्चा होताना दिसत आहे. स्टार स्टॉयनिस ऑलराऊंडर असल्याने दोन्ही डिपार्टमेंटवर त्याचं वर्चस्व आहे.
निकोलस पूरन हा लखनऊ सुपर जायंट्सचा स्टार फलंदाज, मोक्याच्या क्षणी टीमला विजय मिळवून देण्याचा त्याचा प्रयत्न असतो. त्याने वेस्ट इंडिजसाठी कॅप्टन्सी केली असल्याने त्याला कर्णधारपद मिळण्याची शक्यता आहे.
आरसीबीविरुद्धच्या सामन्यात केएल राहुल जखमी झाला होता. त्यानंतर त्याने मैदान सोडलं. आता त्याला शस्त्रक्रियेला सामोरं जावं लागेल, अशातच लखनऊचा कॅप्टन कोण होईल? असा सवाल विचारला जातोय.
लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल आयपीएल (IPL 2023) मधून बाहेर पडला आहे. राहुलने स्वतः एक भावनिक पोस्ट करत माहिती दिली.
LSG कॅप्टन्सीसाठी 'या' तीन नावाची चर्चा!