इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनसाठी नोव्हेंबर महिन्यात मेगा ऑक्शन पार पडलं. या ऑक्शनमध्ये फ्रेंचायझींनी एकूण 182 खेळाडूंवर पैसे खर्च करून त्यांना आपल्या संघात घेतलं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार 14 मार्च रोजी आयपीएल 2025 ला सुरुवात होऊ शकते.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा संघ आयपीएलमधील सर्वात प्रसिद्ध संघांपैकी एक आहे. मात्र त्यांना अद्याप एकदाही विजेतेपद जिंकता आलेलं नाही.
आयपीएल 2025 मध्ये आरसीबीचं नेतृत्व कोणाकडे असणार याविषयी चाहत्यांना मोठी उत्सुकतता आहे.
विराट कोहली किंवा रजत पाटीदार या दोघांपैकी एका खेळाडूकडे आरसीबीच्या कर्णधारपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते असं म्हटलं जात होतं.
परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार मेगा ऑक्शनमध्ये आरसीबीने खरेदी केलेल्या ऑल राउंडर खेळाडूकडे आयपीएल 2025 साठी संघाचं नेतृत्व सोपवलं जाऊ शकत अशी चर्चा आहे.
भारताचा ऑल राउंडर क्रिकेटर कृणाल पंड्या याला आरसीबीने मेगा ऑक्शनमध्ये 5.75 कोटींना विकत घेतलं.
कृणाल पंड्या हा मागील दोन वर्ष लखनऊ सुपर जाएंट्सकडून खेळला. यावेळी केएल राहुलला दुखापत झाली असताना आयपीएल 2023 मध्ये संघाचं नेतृत्व पंड्याने सांभाळलं होतं.
कृणाल पंड्या हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये बडोदाच्या संघाचं नेतृत्व करतो. मागील काही महिन्यांमध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये बडोदाचा संघ चांगली कामगिरी करत आहे.
मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून आयपीएल 2025 मध्ये संघाचा कर्णधार कोण असणार याविषयी अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.