एशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडियाची अखेर घोषणा झाली आहे. भारताचा पहिला सामना 2 सप्टेंबरला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळवला जाणार आहे.
एशिया कप स्पर्धेत भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली नव्या लूकमध्ये दिसणार आहे. विराट आपल्या लूकमुळे नेहमीच चर्चेत असतो.
नव्या लूकचा फोटो विराटने स्वत: आपल्या इन्स्टाग्रामर अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोत विराटने कानात इअररिंग्स घातले आहेत. याला पियर्सिंग म्हणतात.
विराट कोहली लाख तरुणांचा आयकॉन आहे. त्याची हेअरस्टाईल, त्याचे कपडे अनेक तरुण फॉलो करत असतात.
पण विराटसारखी पियर्सिंग तुम्हाला करायचं असेल तर काळजी घेणंही तितकंच महत्वाचं आहे. प्रोफेशन व्यक्तीकडून कान टोचून घ्या, अन्यथा इंफेक्शनचा धोका उद्भवू शकतो.
पियर्सिंग करण्यासाठी आता गनचा वापर केला जातो. यात वेदान थोड्या कमी होता आणि हे सुरक्षितही मानलं जातं.
कान टोचताना सुरक्षितता आणि साफ-सफाई महत्त्वाची आहे. धुळीमुळे किंवा अस्वच्छतेमुळे इंफेक्शन होण्याची शक्यता जास्त असते.
पियर्सिंग केल्यानंतर आपल्या कानांना वारंवार हात लावू नका. कानात तेल घालून इअररिंग अधून-मधून फिरवत राहा.