गुजरात पॉईंट टेबलावर अववलं कशी याच उत्तर शोधायचं झालं तर एक नाव समोर येत ते म्हणजे शुभमन गिल. 4 फिफ्टीच्या जोरावर आक्रमक सुरुवात करून देणायचं काम शुभमन करतोय. याचा परिणाम संघाच्या कामगिरीवर देखील दिसून येतो.
दिल्लीचा एकाकी झुंज देणारा शेर म्हणजे डेव्हिडर वॉर्नर. दिल्लीचा संघ चाचपडत असला तरी कॅप्टन वॉर्नर पुढे येऊन लीड घेताना दिसतोय. त्याने यंदाच्या वर्षी 4 फिफ्टी केल्या आहेत.
कोहली आणि डूप्लेसीसच्या नंतर मिडल ऑर्डरमध्ये मॅक्सवेलचा बोलबाला राहिलाय. आतापर्यंत मॅक्सवेलने 4 फिफ्टी ठोकत बंगळुरूची विजयाची मोहीम फत्ते केलीये.
चेन्नईच्या थालाचा लेफ्ट हँड म्हणून ओळख निर्माण झालेल्या कॉन्व्हेने या आयपीएल हंगामात 5 फिफ्टी झळकावल्या आहेत.
आरसीबीचा दुसरा स्टार खेळाडू म्हणजे डूप्लेसीसी. फाफने यंदाच्या हंगामात विराटप्रमाणे 6 फिफ्टी केल्या आहेत. यंदाच्या हंगामात कर्णधार म्हणून त्याच्या सर्वाधिक हाफ सेंचूरी आहेत.
विराट कोहली याने यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक 6 अर्धशतकं झळकावली आहे. आरसीबीच्या विजयात विराटचा खारीचा वाटा राहिलाय.