MPL 2023: कोणता संघ कितव्या स्थानी?

जाणून घ्या Points Table

टी-ट्वेंटी लीगचा धुरळा

महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या धमाकेदार सामन्यांना सुरूवात झालीये. 10 वर्षानंतर महाराष्ट्र क्रिकेट असोशियनने पुन्हा टी-ट्वेंटी लीगचा धुरळा उडवलाय.

पाइट्स टेबल

यंदाच्या हंगामात 6 संघांचा समावेश आहे. अशातच आता सुरूवातीच्या सामन्यानंतर पाइट्स टेबल पाहा

ईगल नाशिक टायटन्स

ईगल नाशिक टायटन्स संघाने आत्तापर्यंत 3 सामने खेळले असून त्यांनी 3 सामन्यात विजय मिळवलाय. त्यामुळे त्यांच्याकडे 6 अंक आहेत.

पुणेरी बाप्पा

पुणेरी बाप्पा संघाने आत्तापर्यंत 3 सामने खेळले असून त्यांनी 2 सामन्यात विजय मिळवलाय. त्यामुळे त्यांच्याकडे 4 अंक आहेत.

रत्नागिरी जेट्स

रत्नागिरी जेट्स संघाने आत्तापर्यंत 2 सामने खेळले असून त्यांनी 1 सामन्यात विजय मिळवलाय. त्यामुळे त्यांच्याकडे 2 अंक आहेत

कोल्हापूर टस्कर्स

कोल्हापूर टस्कर्सने खेळलेल्या 2 सामन्यांपैकी 1 विजय अन् 1 पराभव नोंदवलाय. त्यामुळे त्यांच्याकडे 2 अंक आहेत.

छत्रपती संभाजी किंग्ज

छत्रपती संभाजी किंग्ज संघाने आत्तापर्यंत 2 सामने खेळले असून त्यांना एकही सामना जिंकता आला नाही. त्यामुळे त्यांच्या खात्यात 0 अंक आहेत.

सोलापूर रॉयल्स

सोलापूर रॉयल्स संघाने आत्तापर्यंत 2 सामने खेळले असून त्यांना देखील एकही सामना जिंकता आला नाही. सोलापूरला भोपळा फोडता आला नाही.

कोण वरचढ ठरणार?

आतापर्यंत ईगल नाशिक टायटन्स 6 गुणांसह पहिल्या तर पुणेरी बाप्पा संघ 4 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे दोघांमध्ये कोण वरचढ ठरणार, हे पहावं लागेल.

VIEW ALL

Read Next Story