वर्ल्ड कपमधील IND vs PAK सामन्यावर मोहम्मद रिझवानचं मोठं वक्तव्य
रोमांचक असा वर्ल्ड कप 2023 सुरू होण्यासाठी फक्त 4 महिने बाकी आहेत. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
वर्ल्ड कप 2023 मध्ये भारतीय संघ 15 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध सामना खेळणार आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वर्ल्ड कप 2023 सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाऊ शकतो.
बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यात सामन्यांच्या शेड्युलवरून वाद सुरू असताना आता पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानने या सामन्याबाबत मोठा दावा केला आहे.
विश्वचषकातील कोणत्याही सामन्यात भारतावर विजय मिळवणं हे विजेतेपदाच्या बरोबरीचे स्थान दिलं जातं, परंतु भारताला पराभूत करणं हे आमच्यासाठी विश्वचषक जिंकण्यासारखं नाही, असं मोहम्मद रिझवान म्हणाला आहे.
भारताचा पराभव नाही तर विश्वचषक जिंकणं हे आमचं सर्वात मोठं उद्दिष्ट आहे, असंही मोहम्मद रिझवान याने म्हटलं आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटचा एकदिवसीय विश्वचषक सामना 16 जून 2019 रोजी खेळला गेला होता. पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ८९ धावांनी धुव्वा उडवला होता.