भारताचा माजी कर्णधार एम एस धोनी एक स्टार क्रिकेटर आहेच मात्र तो एक उत्तम व्यावसायिक सुद्धा आहे.
धोनीने स्पोर्ट्स, फॅशन, मनोरंजन, रिअल इस्टेस्ट अशा अनेक व्यवसायांमध्ये गुंतवणूक केली आहे.
आता मीडिया रिपोर्ट्सनुसार एम एस धोनीने 'हाऊस ऑफ बिर्याणी' या ब्रँडमध्ये गुंतवणूक केलीये.
एम एस धोनीची बिर्याणी कंपनी ही ऑस्ट्रेलिया, जपान, ब्रिटेन, नॉर्थ अमेरिकेत कार्यरत आहे.
रिपोर्ट्सनुसार धोनीच्या या बिर्याणी कंपनीने पुढील 3 वर्षात 450 ते 550 कोटींची कमाई करण्याचे लक्ष ठेवले आहे.
हाऊस ऑफ बिर्याणी हा क्लाऊड किचन ब्रँड असून ज्याची सुरुवात 2022 मध्ये झाली होती.
सध्या दिल्ली, मुंबई, दुबई इत्यादी ठिकाणी त्यांचे 20 आउटलेट आहेत. पुढील काळात 120 ते 130 क्लाऊड किचन खोलण्याचा त्यांचा मानस आहे.