मुंबई इंडियन्सला यंदाच्या सिझनमध्ये हार्दिक पांड्याच्या रुपात नवा कर्णधार मिळाला आहे.
तर पलटणसाठी पाचवेळा आयपीएल जिंकणाऱ्या रोहितच्या अनुभवाची साथ देखील पांड्याला मिळेल.
ऑक्शनमध्ये मुंबईने जेराल्ड कोएत्झी, दिलशान मदुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा या नव्या खेळाडूंना मुंबईने संघात सामील करून घेतलंय.
टीम डेव्हिड, ईशान किशन, रोहित शर्मा यांच्यावर आक्रमक फलंदाजीची कमान असणार आहे.
हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि डेवाल्ड ब्रेविस यांच्यावर मिडल ऑर्डरची जबाबदारी असेल.
जेराल्ड कोएत्झी, दिलशान मदुशंका आणि नुवान तुषारा यांच्यावर गोंलंदाजीची कमान असणार आहे.
तर श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी यांच्यावर फिरकीची जबाबदारी असेल.
टीम डेव्हिड, ईशान किशन, रोहित शर्मा, विष्णु विनोद, नेहाल वढेरा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (C), डेवाल्ड ब्रेविस, पियूष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, रोमारियो शेफर्ड, तिलक वर्मा, जेसन बेहरनड्रॉफ, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोइट्जे, कुमार कार्तिकेय, आकाश माधवाल, दिलशान मधुशंका, अर्जुन तेंदुलकर, नुवन तुशारा, नमन धीर, शिवालिक शर्मा.