टीम इंडियाचे स्टार खेळाडू हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्याल त्यांच्याच सावत्र भावाने करोडो रुपयांना फसवलं. याप्रकरणी वैभवला अटक करण्यात आली आहे.

हार्दिक आणि कृणालचा सावत्र भाऊ वैभवने 2021 मध्ये पॉलिमर बिझनेस नावाची कंपनी सुरु केली. या कंपनीत हार्दिक-कृणालची 40-40 तर वैभवची 20 टक्के भागीदारी होती.

हार्दिक आणि कृणालच्या नकळत वैभवने आपल्या भागिदारीचा हिस्सा 33.3 इतका केला. यामुळे दोन भावांना मोोठ नुकसान सहन करावं लागलं.

वैभवमुळे पंड्या बंधुंना तब्बल 4.3 कोटी रुपयांचं नुकसान सहन करावं लागलं. हार्दिकच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी वैभवला अटक केली. त्याला पचा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलीय.

सोशल मीडिया अकाऊंटवर वैभवने आपलं पूर्ण नाव वैभव हिमांशु पंड्या असं लिहिलं आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे क्रिकेटर्सबरोबर फोटो आहेत.

हार्दिक आणि कृणालनेही वैभवबरोबरचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आयपीएलच्या अनेक सामन्यांना वैभव हजेरी लावतो.

सोशल मीडियावर वैभव पंड्याबाबत फारशी माहिती नाही. पण इस्टाग्राम प्रोफाईलवर त्याने स्वत:च्या नावसमोर एन्टरप्रेन्योर म्हटलं आहे.

VIEW ALL

Read Next Story