'हा' खेळाडू ठरतोय टीम इंडियासाठी गेमचेंजर
टीम इंडियाच्या बॅटिंग ऑर्डरचा बॅकबोन विराट कोहली याने वेस्ट इंडिजविरुद्ध 76 वं शतक ठोकलं. त्यावर आता टीम इंडियाच्या फिल्डिंग कोचने महत्त्वाचं वक्तव्य केलंय.
विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आपल्या आक्रमक वृत्तीला आवर घालत संयमी उत्तम उदाहरण सादर केलं आहे, असं फिल्डिंग कोच टी दिलीप यांनी म्हटलं आहे.
फिटनेसच्या बाबतीत विराट कोहलीचा हात कोणीही धरू शकत नाही. तो एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे, असं फिल्डिंग कोच म्हणतात.
त्यावेळी त्यांनी रविंद्र जडेजा आणि आर आश्विन यांचं देखील कौतुक केलं आहे.
अलीकडे विशेषतः जडेजाने आपल्या फलंदाजीत खूप सुधारणा केली आहे, ज्यामुळे तो सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करतो, असं कोच म्हणतात.
अश्विन फलंदाजी करतानाही संयमाने काम करतो. मागील सामन्यात त्याची बॉलिंग अप्रतिम होती. सध्या तो बॅटिंगने देखील काम चालवतोय. त्यामुळे तो गेमचेंजर ठरतोय, असंही टी दिलीप म्हणतात.
दरम्यान, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने पहिल्या डावात 438 धावा केल्या आहेत.