जाणून घ्या कसं?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा 209 धावांनी पराभव केला आणि आयसीसी ट्रॉफीने पुन्हा भारताला हुलकावणी दिली आहे,
भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये दोनदा परभवाला सामोरं जावं लागलं, पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये न्यूझीलंडने पराभूत केलं तर आता ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झालो.
444 धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव 234 धावांवर संपला. 234 हा आकडा आणि पराभव भारतासाठी काही नवीन गोष्ट नाही.
2003 च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 359 धावांचे आव्हान दिले होते. पण भारताचा डाव 234 धावांत संपुष्टात आला होता.
2015 विश्वचषक फायनलमध्ये सुध्दा भारताचा डाव 234 धावांवर संपुष्टात आला होता, ऑस्ट्रेलियाने भारताला 328 धावांचे आव्हान दिले होते. त्यावेळी देखील भारताला पराभूत व्हावं लागलं.
2023 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताने दुसऱ्या डावात 234 धावा केल्या, तेव्हा ऑस्ट्रेलियाने भारताचा 209 धावांनी पराभव केला.
या सर्व कारणामुळे 234 हा आकडा आयसीसी ट्रॉफीमध्ये अशूभ ठरतोय का? असा सवाल आता उपस्थित होताना दिसत आहे.