आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ भारतात दाखल झाला आहे. तब्बल सात वर्षांनी पाक संघाने भारतात पाऊल ठेवलंय.
बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा क्रिकेट संघ हैदराबाद विमानतळावर दाखल झाला. विमानतळावर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.
पाकिस्तान क्रिकेट संघासाठी खास डायट चार्ट तयार करण्यात आला आहे. यात विशेष पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे.
पाकिस्तानसह विश्वचषक स्पर्धेत खेळणाऱ्या सर्व दहा संघांना जेवणात 'बीफ' मिळणार नाही याची आधीच सूचना देण्यात आली आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघासाठी प्रोटीनसाठी त्यांच्या डायट प्लानमध्ये बटर चिकन, मटन करी आणि फीश हे मांसाहरी पदार्थ ठेवण्यात आले आहेत.
याशिवाय हैदराबादची प्रसिद्ध हैदराबादी बिर्याणीचा खास मेन्यू त्यांच्यासाठी ठेवण्यात आला आहे. पाकिस्तानी खेळाडूंनी बासमती तांदळाचा भात हवा असल्याचीही डिमांड केली आहे.
लीजेंड शेन वॉर्नच्या आवडीचा बोलोग्रीज सॉस आणि स्पेगेटी तसंत शाकाहरी पुलावची मागणीही पाकिस्तानी खेळाडूंनी शेफकडे केली आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघाचा पहिला सामना 6 ऑक्टोबरला नेदरलँडशी रंगणार आहे. तर 14 ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान आमने सामने येणार आहेत.