भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली यंदा आरसीबीकडून आयपीएलचा 18 वा सीजन खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या खास रेकॉर्डबद्दल जाणून घेऊयात.
विराट कोहली आयपीएलच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत झालेले एकूण 17 सीजन केवळ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला आहे. कोहली शिवाय असा कोणताही खेळाडू नाही जो सलग इतके सीजन एकाच फ्रेंचायझीसाठी खेळला असेल.
विराट कोहली हा आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने 8004 धावा केल्या आहेत.
विराट कोहलीच्या नावावर एका सीजनमध्ये सर्वाधिक 973 धावा करण्याचा रेकॉर्ड आहे. त्याने 2016 मध्ये 4 शतक आणि 7 हाफ सेंचुरी केल्या होत्या.
विराट कोहलीने आयपीएलमध्ये आतापर्यंत फिल्डिंग करताना सर्वाधिक 114 कॅच घेतले आहेत.
विराट आयपीएलचे 17 सीजन खेळला असला तरी अद्याप एकदाही त्याच्या संघाला आयपीएलचे विजेतेपद पटकावता आलेले नाही. हा नको असलेला रेकॉर्ड देखील विराटच्या नावावर आहे.