पाकिस्तान भारताशी नडला! लिंबू-टिंबू संघाने बाबर आझमचाच बकरा केला

Swapnil Ghangale
Nov 29,2023

यजमानपदाची संधी गमावणार

आशिया चषकानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चॅम्पियन्स चषक 2025 च्या यजमानपदाची संधीही गमावण्याची शक्यता आहे.

अशी खेळवली जाऊ शकते स्पर्धा

समोर आलेल्या माहितीनुसार, चॅम्पियन्स चषक स्पर्धा पूर्णपणे पाकिस्तानमध्ये न खेळवता काही सामने युएई आणि काही सामने पाकिस्तानात अशी खेळवली जाऊ शकते.

नुकसानभरपाईची मागणी

पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने याच पार्श्वभूमीवर अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे भारतीय संघ पाकिस्तानमध्ये आला नाही तर आम्हाला नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.

पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड

याच संधीचा फायला घेत आयर्लंड क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाला ट्रोल केलं आहे.

आम्ही माघार घेणाऱ्यांमधील नाही

"आम्ही माघार घेणाऱ्यांमधील नाही. आम्ही 2025 चा चॅम्पियन्स चषक स्पर्धेच्या आयोजकपदावर दावेदारी सांगितली आहे. याबद्दल आयसीसीच्या जॉर्ज बार्केले यांचं काय म्हणणं आहे याची वाट पाहत आहोत," असं पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने पोस्ट केलं आहे.

आयर्लंड क्रिकेट बोर्डाचा टोला

यानंतर आयर्लंड क्रिकेट बोर्डाच्या ट्वीटर हॅण्डलवरुन एक पोस्ट करत पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमला ट्रोल केलं आहे.

या प्रश्नावरुन बाबरला केलं ट्रोल

कोरोनासाथीनंतर सामान्य झालेल्या नाहीत अशा गोष्टींपैकी एखादी सांगू शकाल का? असा प्रश्न विचारण्यात आलेल्या ज्यावर आयर्लंड क्रिकेट बोर्डाने रिप्लाय देत बाबरला ट्रोल केलं.

आयर्लंड क्रिकेट बोर्डाने उत्तर दिलं की...

आयर्लंड क्रिकेट बोर्डाने या प्रश्नाला उत्तर देताना, "बाबर आझमचं बॅटिंग एव्हरेज" असं म्हटलं.

...म्हणून बाबर झाला ट्रोल

मागील बऱ्याच काळापासून बाबरला त्याच्या नावाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. भारतात झालेल्या वर्ल्ड कप 2023 मध्येही त्याच्या बॅटमधून मोजक्याच धावा निघाल्याने त्याला ट्रोल करण्यात आलं आहे.

VIEW ALL

Read Next Story