पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची आयसीसीकडे तक्रार, काय आहे नेमकं प्रकरण?

Published by: Zee Team | Oct 18, 2023

पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे औपचारिक निषेध नोंदवलाय.

Published by: Zee Team | Oct 18, 2023

भारतात सुरू असलेला क्रिकेट विश्वचषक कव्हर करण्यासाठी पाकिस्तानी पत्रकारांना व्हिसा देण्यात विलंब झाला असल्याची तक्रार पीसीबीकडून करण्यात आली आहे.

Published by: Zee Team | Oct 18, 2023

पीसीबीनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं की, 'पाकिस्तानी पत्रकारांना व्हिसासाठी होणारा विलंब आणि चाहत्यांना नाकारण्यात आलेला व्हिसा, यावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं आयसीसीकडे औपचारिक निषेध नोंदवला.

Published by: Zee Team | Oct 18, 2023

भारताविरुद्धच्या सामन्यादरम्यान पाकिस्तान संघासोबत झालेल्या अनुचित वर्तनाबद्दलही पीसीबीनं आयसीसीकडे तक्रार केली आहे

Published by: Zee Team | Oct 18, 2023

14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या भारताविरुद्धच्या लढतीसाठी फक्त एक ते दोन पाकिस्तानी पत्रकार उपस्थित होते.

Published by: Zee Team | Oct 18, 2023

या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे. 7 विकेट्सने टीम इंडियाने पाकिस्तानवर विजय मिळवलाय.

Published by: Zee Team | Oct 18, 2023

VIEW ALL

Read Next Story