ऑलिम्पिकआधीच टीम इंडियाला धक्का!दिग्गज खेळाडूची मोठी घोषणा

पॅरिस ऑलिम्पिकला आता जास्त दिवस राहिले नाहीत. 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान खेळ खेळवले जातील.

पॅरिस ऑलिम्पिकआधीच टीम इंडियासाठी वाईट बातमी येतेय. अनुभवी गोलकीपर आणि माजी कॅप्टन पीआर श्रीजेशने निवृत्तीची घोषणा केली.

पॅरिस ऑलिम्पिक माझे शेवटचे आंतरराष्ट्रीय टुर्नामेंट असेल, असे त्याने म्हटले. श्रीजेशचे हे चौथे ऑलिम्पिक असेल.

श्रीजेशने 2021 च्या टोकियोमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये सुंदर गोलकिपिंग करत भारताला कास्य मिळवण्यात मोठी भूमिका बजावली.

श्रीजेशने 2010 मध्ये पदार्पण केले होते.2014 च्या आशियाई खेळांमध्ये सुवर्ण पदक आणि 2018 मध्ये कास्य पदक जिंकणाऱ्या टीमचा तो सदस्य राहिलाय.

2018 मध्ये आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीची संयुक्त विजेता टीम, भुवनेश्वरमध्ये 2019 एचआयएच पुरुष सिरिज फायनलची सुवर्ण पदक विजेती टीम आणि बर्मिंघम 2022 राष्ट्रमंडल खेळांमध्ये रजत पदक मिळवणाऱ्या टीमचा भाग होता.

एचआयएफ हॉकी प्रो लीग 2021-22 मध्ये भारताला तिसऱ्या स्थानापर्यंत पोहोचवण्यात त्याने महत्वाची भूमिका बजावली. श्रीजेशला 2021 मध्ये मेजर ध्यानचंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

वर्ल्ड गेम अॅथलिट्स ऑफ द इयर जिंकणारा तो भारताचा दुसरा खेळाडू आहे.

त्याने 2021, 2022 मध्ये सलग दोनवेळा एचआयएफ गोलकिपर ऑफ द इयर पुरस्कार जिंकलाय.

मला माझ्या करिअरचा अभिमान आहे.माझा आतापर्यंतचा प्रवास असाधारण होता.माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी धन्यवाद, असे श्रीजेश म्हणतो.

माझे सहकारी वाईट काळात माझ्यासोबत होते. आम्ही पॅरिसमध्ये दमदार कामगिरी करण्यासाठी सज्ज आहोत.निश्चतच आम्हाला पदकाचा रंग बदलायचा आहे, असेही तो म्हणाला.

VIEW ALL

Read Next Story