World Cup नंतर 'हे' खेळाडू घेणार निवृत्ती?
आगामी वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा निवृत्तीची घोषणा करू शकतो. रोहित शर्मा टी-ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा सुरू आहे.
ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचं समोर आलं आहेत. याबाबत स्वत: वॉर्नरने संकेत दिलेत.
बांग्लादेश संघासाठी धावून आलेला कॅप्टन शाकिब अल हसन आता वनडे संघाला अलविदा ठोकू शकतो.
ऑस्ट्रेलिया स्टार गोलंदाज मिचेल स्टार्क आता वर्ल्ड कपनंतर निवृत्ती घेण्याच्या तयरीत आहे. मागील काही काळापासून तो संघातील स्थान टिकवू शकला नाही.
युवा खेळाडूंच्या पदार्पणामुळे मागे राहिलेल्या शिखर धवनला आशिया कप स्पर्धेसाठी संधी मिळाली नाही. तर वर्ल्ड कपसाठी देखील त्याचा समावेश होणार नाही, अशी शक्यता आहे. त्यामुळे आता शिखर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची शक्यता आहे.
इंग्लंडच्या फलंदाजीचा स्तंभ जो रूट आता वर्ल्ड कपनंतर संघात दिसण्याची शक्यता कमी आहे. तो येत्या काळात फक्त टेस्ट टीममध्ये दिसू शकतो.
बांग्लादेशचं कर्णधारपद सोडल्यानंतर आता तमीम इकबाल निवृत्तीच्या मार्गावर असल्याचं बोललं जातंय.
गेल्या 10 वर्षात आपल्या धारदार गोलंदाजीने जगभरात खळबळ मारवणारा ट्रेंट बोल्टने निवृत्ती घेण्याच्या तयारीत आहे. त्याचा हा शेवटचा वर्ल्ड कप असेल, अशी चर्चा होताना दिसते.