IPL ही जगातील सर्वात मोठी टी-20 लीग आहे. ही लीगचा अंतिम सामना आज म्हणजेच 3 जून रोजी खेळला जाणार आहे.
अशातच आज आम्ही तुम्हाला सर्वात जास्त IPL फायनल खेळलेले खेळाडू कोण आहेत याबद्दल सांगणार आहोत.
चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज एमएस धोनीने आतापर्यंत एकूण 11 IPL फायनल सामने खेळले आहेत. या 11 सामन्यांपैकी 5 सामन्यांमध्ये धोनीने विजय मिळवला.
अष्टपैलू रवींद्र जडेजा आतापर्यंत एकूण 8 वेळा IPL फायनल सामने खेळला आहे.
अंबाती रायडूने IPLमध्ये एकूण 8 अंतिम सामने खेळले आहेत.
माजी अष्टपैलू सुरेश रैनाने IPL मध्ये एकूण 8 अंतिम सामने खेळले आहेत.
मुंबई इंडियन्सच्या किरॉन पोलार्डने आयपीएलमध्ये एकूण 6 अंतिम सामने खेळले आहेत.
वेस्ट इंडिजच्या माजी डॅशिंग अष्टपैलू ड्वेन ब्रावो या खेळाडूने एकूण 7 वेळा IPL चे अंतिम सामने खेळले आहेत.
हार्दिक पांड्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 6 अंतिम सामने खेळले आहेत.
रोहित शर्माने देखील आतापर्यंत आयपीएलमध्ये 6 अंतिम सामने खेळले आहेत.