Preity Zinta 18 वर्षे वाट पाहिल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) ने अखेर 2025 च्या आयपीएल फायनलमध्ये पंजाब किंग्जचा पराभव करून त्यांचे पहिले विजेतेपद जिंकले.
सामना जिंकल्यानंतर आरसीबीच्या खेळाडूंमध्ये आणि चाहत्यांमध्ये प्रचंड आनंद होता. पण पंजाब किंग्जच्या खेळाडूंमध्ये, चाहत्यांमध्ये, सह-मालक आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा यांच्यासाठी हा भावनिक क्षण होता.
वर्षानुवर्षे पाहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी पंजाब किंग्ज मैदानात उतरली होती पण नशिबाने पुन्हा एकदा त्यांना साथ दिली नाही.
सामना संपल्यानंतर प्रीती झिंटा खूप दुःखी दिसत होती, हे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडिओमध्ये दिसून येतंय.
तिने पांढरा कुर्ता, लाल दुपट्टा आणि सलवार घातला होता. पण तिच्या चेहऱ्यावर पराभवाचे दुःख स्पष्टपणे दिसत होते. मैदान सोडताना ती भावनिक झाली, तिच्या डोळ्यात अश्रू होते, जे तिच्या चाहत्यांना स्पष्टपणे दिसले आणि दुःखही जाणवले.
प्रितीने तिच्या खेळाडूंना सांत्वन दिले. श्रेयस अय्यर सारख्या खेळाडूला भेटून त्याला प्रोत्साहन दिले. तिच्या या भावनिक आणि हृदयद्रावक क्षणाने नेटिझन्सनही भावूक झाला. प्रीती संघाशी भावनिकदृष्ट्या जोडली गेलीय, असे चाहते म्हणतायत.
अनेकांनी सोशल मीडियावर लिहिले, 'भाई, तीही 18 वर्षांपासून वाट पाहत आहे', तर दुसऱ्याने लिहिले- '2014 नंतर प्रितीच्या डोळ्यात पुन्हा अश्रू दिसले... मन दुखावले.'
आरसीबीने 18 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच आयपीएल जिंकले.पंजाब किंग्जलाही त्यांचे पहिले विजेतेपद जिंकायचे होते पण ते अंतिम फेरीत पराभूत झाले.
प्रिती झिंटा 2008 पासून पंजाब किंग्जशी संबंधित आहे आणि प्रत्येक हंगामात तिचा भावनिक पाठिंबा दिसून येतो.
प्रिती झिंटा ही आयपीएलच्या सर्वात लोकप्रिय फ्रँचायझी मालकांपैकी एक आहे. ती प्रत्येक सामन्यात टीमला प्रोत्साहन देते आणि खेळाडूंशी भावनिकदृष्ट्या जोडलेली दिसते. 2014 च्या अंतिम फेरीत जेव्हा पंजाब किंग्ज केकेआरकडून पराभूत झाली तेव्हा ती देखील अशीच दुःखी दिसली होती.