अश्विन ते श्रीजेश... 'या' खेळाडूंचा झाला पद्म भूषण आणि पद्म श्री पुरस्काराने सन्मान

Published by: Pooja Pawar | Apr 29, 2025

सोमवारी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत राष्ट्रपति भवनात पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्म श्री पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

Published by: Pooja Pawar | Apr 29, 2025

या वर्ष 2025 साठी झालेल्या पुरस्कार सोहळ्यात 4 पद्म विभूषण, 10 पद्म भूषण आणि 57 पद्म श्री पुरस्कार प्रदान करण्यात आले.

Published by: Pooja Pawar | Apr 29, 2025

यात क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी 3 खेळाडूंना सन्मानित करण्यात आले होते. यावेळी उपराष्ट्रपति जगदीप धनखड़, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Published by: Pooja Pawar | Apr 29, 2025

राष्ट्रपती मुर्मूंच्या हस्ते केरळच्या पी.आर. श्रीजेश याला क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. पी.आर. श्रीजेश हा भारताचा माजी हॉकी गोलकीपर असून तो जुनिअर भारतीय हॉकी संघाचा हेड कोच आहे. श्रीजेशने 22 वर्षांच्या हॉकी करिअरमध्ये दोन ऑलम्पिक कांस्य पदक आणि तीन वेळा प्रतिष्ठित एफआईएच गोलकीपर ऑफ द ईयर जिंकणारा जगातील एकमेव हॉकी गोलकीपर आहे.

Published by: Pooja Pawar | Apr 29, 2025

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भारतीय क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज आर अश्विन याला सुद्धा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. यापूर्वी अश्विनला अर्जुन पुरस्कार आणि आयसीसी टूर्नामेंटमध्ये अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

Published by: Pooja Pawar | Apr 29, 2025

डॉ. सत्यपाल सिंह यांना सुद्धा राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एथलेटिक्स कोच आणि मेंटॉर डॉ. सिंह यांनी भारतीय पॅरा- स्पोर्ट्समध्ये असाधारण योगदान दिलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरा एथलीटने पॅरालम्पिक, वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि आशिया पॅरा खेळांमध्ये पदक जिंकले.

Published by: Pooja Pawar | Apr 29, 2025

VIEW ALL

Read Next Story