हिंदू क्रिकेटर बनला पाकिस्तानच्या टीमचा नवा कोच

Pooja Pawar
Mar 28,2025


आयपीएल 2025 ला दणक्यात सुरुवात झाली आहे. तर काही दिवसातच पाकिस्तान सुपर लीगचा 10 वा सीजन सुद्धा सुरु होईल.


पाकिस्तानच्या या लीगमधील एका संघाने एका हिंदू क्रिकेटरला त्यांचा कोच म्हणून नेमण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.


पाकिस्तान सुपर लीगचा गतविजेता संघ कराची किंग्सने हिंदू क्रिकेटर रवि बोपारा याला हेड कोच म्हणून नेमलं आहे.


भारतीय वंशाचा रवि बोपारा हा इंग्लंडचा माजी क्रिकेटर असून तो इंग्लंडच्या संघासाठी क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये खेळला आहे.


इंग्लंड संघासाठी 150 हून अधिक सामने खेळलेला रवि बोपारा हा स्वतः यापूर्वी पाकिस्तान सुपर लीगमध्ये कराची किंग्सकडून खेळला आहे.


पाकिस्तान सुपर लीगच्या नव्या सीजनसाठी कराची किंग्सने डेव्हिड वॉर्नर याला कर्णधार बनवलं आहे.


पाकिस्तान सुपर लीगचा नवा सीजन हा 11 एप्रिल ते 18 मे पर्यंत होणार आहे. प्रथमच आयपीएल आणि पीएसएल या दोन्ही स्पर्धा एकाचवेळी होणार आहेत.

VIEW ALL

Read Next Story