क्रिकेट हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक असून लवकरच (वर्ल्ड प्रिमियर लिग) WPL सुरु होणार असल्याने क्रिकेटप्रेमी खूप उत्सुक आहेत.
WPLविषयीच्या अपडेट्सची क्रिकेटचे चाहते आतुरते वाट पाहत असतात.
दरम्यानच, RCB या मोठा चाहता वर्ग असलेल्या संघाने विश्वचषक विजेत्या खेळाडूला प्रशिक्षक म्हणून निवडले आहे.
आरसीबीने 2026च्या वर्ल्ड प्रिमियर लिगसाठी नवीन गोलंदाज प्रशिक्षकाची नियुक्ती केली आसून ही महिला खेळाडू 'अन्या श्रुबसोल' आहे.
अन्या श्रुबसोल ही इंग्लेडची माजी वेगवान गोलंदाज असून 2017च्या विश्वचषक विजेत्या संघातील महत्तवाची खेळाडू होती.
अन्या श्रुबसोलने 2022 मध्ये निवृत्तीची घोषणा केली. तिने तब्बल 173 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
चार वेळा चौथ्या स्थानावर राहिल्यानंतर आरसीबीने 2024 मध्ये पहिल्यांदाच WPL जिंकली.