धोनीच्या CSK ची फॅन फॉलोईंग RCB समोर पडली फिकी, नोंदवला नवा विक्रम

Pooja Pawar
Mar 31,2025


इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सर्वात प्रसिद्ध टी २० लीग असून यंदा या स्पर्धेचा १८ वा सीजन आहे.


यंदा या स्पर्धेत एकूण १० संघांनी सहभाग घेतला असून मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स हे दोन संघ स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहेत. यांनी प्रत्येकी वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले.


आयपीएल संघांची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. मात्र त्यातही मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपरकिंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या संघांचे फॅन्स बाजी मारताना दिसतात.


काही दिवसांपूर्वी चेन्नई सुपरकिंग्सच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 17.7 मिलियन फॉलोअर्स होते आणि त्यामुळे ती इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोवर्स असणारी आयपीएल फ्रेंचायझी होती. मात्र आता आरसीबीने चेन्नईला याबाबत मागे टाकलं आहे.


रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू ही फ्रेंचायझी सध्याच्या घडीला इंस्टाग्राम अकाउंटवर सर्वाधिक फॉलोअर्स असणारी फ्रेंचायझी आहे. आरसीबीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 17.8 मिलियन फॉलोअर्स आहेत.


केवळ फॉलोअर्सच्या बाबतीतच नाही तर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आयपीएल 2025 मध्येही चेन्नईवर भारी पडताना दिसतेय.


चेपॉक स्टेडियमवर झालेल्या आयपीएल 2025 च्या नवव्या सामन्यात आरसीबीने चेन्नईवर तब्बल 50 धावांनी विजय मिळवला होता.

VIEW ALL

Read Next Story