गुजरात सरकारच्या मंत्रीमंडळात दोन दिवसांपूर्वी मोठे बदल घडले असून यात मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल सोडून इतर सर्व मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे.
सर्व मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आता नव्या मंत्रिमंडळाची स्थापना झाली असून यात क्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा हिचा समावेश करण्यात आलेला आहे.
रिवाबा जडेजाने शुक्रवारी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर रिवाबा पुन्हा एकदा चर्चेत आली. २०२२ मध्ये जामनगरमधून भाजपच्या तिकिटावर ती आमदार म्हणून निवडून आली होती.
रिवाबा जडेजा हिने अहमदाबाद येथील गुजरात टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली.
महिलांना मदत करण्यासाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी रिवाबा श्री मातृशक्ती चॅरिटेबल ट्रस्ट नावाची एनजीओ सुद्धा चालवते.