Rohit Sharma Weight Loss: वजन कमी करण्यासाठी काय करतो हिटमॅन? डाएट, वर्कआऊट सर्वकाही जाणून घ्या!

Pravin Dabholkar
Mar 03,2025


टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा त्याच्या बॅटींगसोबतच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो.


रोहित शर्माचा विसरभोळा स्वभाव आणि त्याचे वजन यावर सोशल मीडियात वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असतात.


दरम्यान रोहित शर्माने खास डाएट प्लान करुन आपलं वजन खूप कमी केलंय.


रोहित शर्माच्या दिवसाची सुरुवात प्रोटीनवाले ओट्स,दूध आणि अंडी खाऊन होते.


रोहित शर्मा फेळे आणि भाज्या खातो तसेच नैसर्गिक फ्लेवरचे प्रोटीनदेखील पितो.


मसल्ससाठी प्रोटीन ड्रींक फायद्याचं असतं असं रोहित शर्माला वाटतं.


रोहित शर्मा ग्रीन टी पिण्यावर जास्त जोर देतो.


ब्राऊन राइससोबत घरचे डाळ भात खाण्यावर रोहित शर्मा जास्त भर देतो.


रोहित शर्मा रागीच्या पीठाच्या चपात्या खाणे पसंत करतो.


रोहित शर्मा कार्डिओ आणि वेट ट्रेनिंगचा आपल्या वर्कआऊटमध्ये समावेश करतो.

VIEW ALL

Read Next Story