ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी 20 क्रिकेटमध्ये शतक ठोकणारा एकमेव भारतीय फलंदाज

Published by: Pooja Pawar | Oct 29, 2025

टीम इंडियाचा संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून येथे ते पाच सामन्यांची टी 20 सीरिज खेळणार आहेत. 29 ऑक्टोबर पासून उभा या सीरिजला सुरुवात होईल.

Published by: Pooja Pawar | Oct 29, 2025

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी 20 सामन्यांच्या इतिहासात, टीम इंडियाच्या फक्त एकाच खेळाडूने शतक झळकावले आहे.

Published by: Pooja Pawar | Oct 29, 2025

मात्र असं असलं तरी या क्रिकेटरला भारतीय संघात न खेळून जवळपास एक वर्ष झालंय.

Published by: Pooja Pawar | Oct 29, 2025

मराठमोळा क्रिकेटर ऋतुराज गायकवाड हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी 20 क्रिकेटमध्ये शतक ठोकणारा एकमेव भारतीय फलंदाज आहे.

Published by: Pooja Pawar | Oct 29, 2025

2023 मध्ये ऋतुराज गायकवाडने गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 57 बॉलमध्ये नाबाद 123 धावा केल्या होत्या.

Published by: Pooja Pawar | Oct 29, 2025

ऋतुराज गायकवाडच्या या शतकात 13 चौकार आणि 7 सिक्सचा समावेश होता.

Published by: Pooja Pawar | Oct 29, 2025

टीम इंडियासाठी ऋतुराज गायकवाडने 6 वनडे आणि 23 टी 20 सामने खेळले आहे.

Published by: Pooja Pawar | Oct 29, 2025

दुसरीकडे तीन ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी भारताविरुद्ध टी 20 मध्ये शतकं झळकावली आहेत. यात शेन वॉटसन, ग्लेन मॅक्सवेल आणि जो इंगल्स यांचा समावेश आहे.

Published by: Pooja Pawar | Oct 29, 2025

VIEW ALL

Read Next Story