भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हा सोशल मीडियावर फार सक्रीय आहे. निवृत्तीनंतर सचिन तेंडुलकर अधिक सक्रीय झाला आहे.
सचिन तेंडुलकर वर्ल्ड कप खेळत नसला तरी कधी पंतप्रधान मोदींना दिलेली भेट करत कधी वर्ल्ड कप संदर्भातील पोस्टमुळे तो चर्चेत असतो.
सचिनने आज दसऱ्यानिमित्त सर्व फॉलोअर्सला आणि चाहत्यांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सचिनने त्याच्या घरातील देवघरातील फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये तो देवासमोर नतमस्तक होताना दिसतोय.
एका फोटोत सचिन तेंडुलकर त्याच्या आईच्या पाया पडताना दिसत आहे.
सचिनच्या देवघरामध्ये विठ्ठल-रखुमाईची मूर्ती, स्वामी समर्थांचा फोटोही दिसत आहे.
सचिनने कसोटी क्रिकेटमध्ये वापरतात तो लाल रंगाचा बॉल आणि बॅटही देव्हाऱ्यासमोर ठेवली असून तिच्याही तो पाया पडला आहे.
'ज्या पद्धतीने चेंडू बॉण्ड्री लाइन ओलांडून जातो त्याप्रमाणेच चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यातील वाईट गोष्टीचे अडथळे दूर करो,' असं सचिन म्हणाला आहे.
आयुष्यामध्ये चांगल्या कारणांसाठी फलंदाजी करत राहा असंही सचिनने म्हटलं आहे. अनेक चाहत्यांनी सचिनच्या या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.
सचिनने गणेशोत्सवादरम्यान गणपती विसर्जनाचे फोटोही पोस्ट केले होते.
सचिनने गणेशोत्सवामध्ये अगदी गणरायाची आरती करतानाचे व्हिडीओ आणि फोटोही शेअर केलेले.