वर्ल्ड कप आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. वर्ल्ड कपच्या सहाही सामन्यात रोहितसेनेने चांगली कामगिरी केलीये.
त्यामुळेच टीम इंडिया यंदा वर्ल्ड कप जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला जातोय. अशातच आता टीम इंडियाचा माजी स्टार खेळाडू सौरव गांगुली याने मोठं वक्तव्य केलंय.
एकदिवसीय विश्वचषक पुन्हा विजेते होण्याच्या भारताच्या मार्गात कोणते अडथळे असतील? यावर सौरव गांगुलीने भाष्य केलंय.
सौरव गांगुली याने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघाचं नाव घेतलंय.
ऑस्ट्रेलियाने खरोखर चांगले पुनरागमन केलंय. त्यांचा न्यूझीलंडविरुद्धचा आजचा विजय खरोखरच रोमांचक होता, असं गांगुली म्हणतो.
इंग्लंड अशी कामगिरी करेल असं मला कधीच वाटलं नव्हतं, असं म्हणत सौरव गांगुलीने नाराजी व्यक्त केलीये.
भारताचा विचार केला तर तो एक मजबूत संघ आहे आणि चांगली कामगिरी करत आहे पण चॅम्पियनशिप अजून दूर आहे, असंही गांगुली म्हणतो.