भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे.

Aug 21,2024


बीसीसीआयची एकूण संपती आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये जवळपास 16493 कोटी रुपये इतकी आहे.


पण क्रीडा जगतातला एक खेळाडू असा आहे, ज्याची संपत्ती बीसीसीआयपेक्षाही जास्त आहे.


महान बास्केटबॉल खेळाडू मायकल जॉर्डन हा सर्वात श्रीमंत खेळाडू म्हणून ओळखला जातो. त्याचं नेटवर्थ 3.2 बिलिअन डॉलर्स म्हणजे 26816 कोटी रुपये इतकं आहे.


मायकेल जॉर्डन 1980-90 च्या दशकात बास्केटबॉल लीग NBA मध्ये शिकागो बुल्सचा खेळाडू होता. शिकागो बुल्सने सलग दोन वेळा विजयाची हॅटट्रीक केली होती.


खेळातून करोडो रुपये कमवाणारा मायकल जॉर्डन जाहीरात क्षेत्रातही अनेक मोठ्या ब्रँडशी जोडला गेला होता. यातूनही त्याने करोडो रुपयांची कमाई केली.


प्रसिद्ध स्पोर्ट्स कंपनी NIKE ने मायकल जॉर्डनशी कोट्यवधीचा करार केला होता. नाईकेने खास एअर जॉर्डन ब्रँडही बाजारात आणला होता.

VIEW ALL

Read Next Story