भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या नावावर मैदाना अनेक विक्रम जमा आहेत. नुकतीच त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 76 वी सेंच्युरी पूर्ण केली.

विराट कोहलीची एकूण संपत्तीही हजार कोटींहून जास्त आहे. क्रिकेटमधल्या मानधनाबरोबरच जाहीरात आणि सोशल मीडियातूनही विराट करोडो कमावतो.

StockGro ने दिलेल्या आकडेवारीनुसार विराट कोहलीची एकूण नेटवर्थ 1050 कोटी रुपये इतकी आहे

ण तुम्हाला माहित आहे का विराट कोहलीच्या एकूण संपत्तीपेक्षा दुप्पट सॅलरी एका खेळाडूची होण्याची शक्यता आहे.

फुटबॉल जगतात लवकरच एक मोठा करार होण्याची शक्यता आहे. हा करार झाला तर फुटबॉल स्टार किलियन एम्बाप्पे याला 2716 कोटी मिळण्याची शक्यता आहे.

सऊदी अरेबियातील अल हिलाल या क्लबरोबर एम्बाप्पेचा करार होण्याच्या मार्गावर आहे.

अल हिलाल क्बल आणि एम्बाबेदरम्यान हा करार झाला तर फुटबॉल जगतातीलहा आतापर्यंतचा सर्वात मोठा करार असेल

याआधी नेयमारल PSG क्लबने 198 मिलिअन डॉलर म्हणजे जवळपास 1800 कोटी रुपये देऊन खरेदी केलं होतं. या कराराने फुटबॉल जगतात खळबळ उडाली होती.

फ्रेंच क्लब PSG साठी एम्बाप्पे आतापर्यंत खेळत होता, पण या क्लबरबोर पुढे खेळण्यास त्याने असमर्थता दर्शवली आहे.

पीएसजी क्लबने एम्बाप्पेला विकण्याची तयारी सुरु केली आहे. यातून त्यांना चांगली किमत मिळू शकते.

VIEW ALL

Read Next Story