एशिया कप स्पर्धेत पाकिस्तानने सुपर-4 मध्ये विजय मिळवत दणक्यात सुरुवात केली आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरस रौप या स्पर्धेत जबरदस्त फॉर्मात आहे.

एशिया कप स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत हॅरिस रौफ अव्वल स्थानावर आहेत. अवघ्या तीन सामन्यात त्याने नऊ विकेट घेतल्या आहेत.

हॅरिस रौफबरोबरच त्याची पत्नीही सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. एखाद्या अभिनेत्रीलाही मागे टाकेल असं तीचं सौंदर्य आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

हॅरिस रौफच्या पत्नीचं नाव मुजना मसूद मलिक असं आहे. हॅरिस आणि मुजना एक शाळेत असल्यापासून एकमेकांना ओळखतात. 2022 डिसेंबरमध्ये या दोघांनी निकाह केला.

मुजना मसूद मलिक ही पाकिस्तानची प्रसिद्ध मॉडेल आहे. याशिवाय ती एक टिकटॉक स्टार आहे तसंच सोशल मीडिया इफ्लुएंसर आहे.

मुजना मसूद मलिकने अनेक मोठ्या ब्रँडसाठी मॉडलिंग केलं आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरही ती अनेक ब्रँड्सचं प्रमोश करते. यातून ती चांगली कमाई करते.

मीडिया रिपोर्टनुसार मुजना मसूद मलिकची नेटवर्थ 8 कोटी रुपये इतकी आहे. तिची लाईफस्टाईलही लक्झरी आहे.

गेल्या वर्षी लग्नानंतर मुजनाचा एक वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर लीक झाला होता. पण हा व्हिडिओ एडिट केल्याचं स्पष्टीकरण रौफने दिलं होतं.

VIEW ALL

Read Next Story