आज 14 सप्टेंबर...टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू सूर्यकुमार यादवचा वाढदिवस आहे. सूर्यकुमार यादव बॅडमिंटनपटू ते क्रिकेट कसा झाला याची ही कहाणी आहे. सूर्यकुमार हा जूनियर लेवलवर उत्तम बॅडमिंटनपटू राहिलाय.
जसजसा सूर्यकुमार मोठा होत गेला तसं त्याचं बॅडमिंटनबद्दलचं प्रेम कमी होऊ लागलं. याचं कारण होतं सामना खेळायला लागणारा वेळ.
बॅडमिंटनचा सामना जास्तीत जास्त एका तासाभरात संपायचा. त्यामुळे सूर्या जास्त वेळ घरापासून दूर राहू शकत नव्हता. यामुळे त्याने क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून तो घरापासून जास्त वेळ दूर राहू लागला.
सूर्यकुमार यादवने वयाच्या 14 व्या वर्षापासून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. मात्र टीम इंडियामध्ये त्याची एन्ट्री काहीशी उशीराने झाली. मात्र जेव्हा त्याची टीमध्ये एन्ट्री झाली तेव्हा तुफान आलं.
14 सप्टेंबर 1990 रोजी जन्मलेल्या सूर्यकुमार यादवची एकूण संपत्ती 45 कोटी रुपये आहे. यामध्ये त्याला बीसीसीआयसोबत वार्षिक करारानुसार 3 कोटी रुपये मिळतात.
टीम-20 क्रिकेटमध्ये सूर्याला तोड नाही. आयपीएल असो की आंतरराष्ट्रीय क्रिकेट सर्वत्र सूर्यकुमारची जादू आहे.