सर्वात वजनदार क्रिकेटर.. एकाने तर जिंकून दिलाय World Cup! यंदाच्या वर्ल्ड कपमध्येही 110 किलोचा खेळाडू

Swapnil Ghangale
Jun 02,2024

वजनामुळे चर्चेत पाकिस्तानी क्रिकेटपटू

पाकिस्तानचा आजम खान सध्या टी-20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर बराच चर्चेत आहे तो त्याच्या वजनामुळे!

निवडीवर प्रश्नचिन्ह

110 किलो वजन असणाऱ्या आजम खानला पाकिस्तानच्या संघात निवडला असला आणि तो सराव सामने खेळला असला तरी त्याच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उभं केलं जात आहे.

एकमेव खेळाडू नाही

मात्र जास्त वजन असणारा आजम खान हा काही एकमेव खेळाडू नाही. यापूर्वीही असे अनेक खेळाडू क्रिकेट मैदानात दिसले आहेत.

पाकिस्तानचा इंझमाम यादीत

1992 मध्ये पाकिस्तानला वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या संघातील इंझमाम उल हकचं वजन तेव्हा 100 किलो होतं.

100 किलोचा अफगाणिस्तानी क्रिकेटपटू

अफगाणिस्तानचा विकेटकीपर फलंदाज असलेला मोहम्मद शहजादचाही या यादीत समावेश होतो. त्याचं वजन 100 किलो आहे.

न्यूझीलंडच्या खेळाडूचाही समावेश

न्यूझीलंडकडून क्रिकेट खेळलेला जेसी रायडरचं वजन 100 किलो होतं.

102 किलोचा ऑस्ट्रेलियन खेळाडू

मार्क कॉसस्र्गोव या ऑस्ट्रेलियन खेळाडूचं वजन 102 किलो होतं. तो ऑस्ट्रेलियासाठी 3 वनडे खेळला आहे.

110 वजनाचा इंग्लिश खेळाडू

माइक गेटिंग या इंग्लंडच्या खेळाडूचं वजन 110 किलो होतं. तरी त्याने इंग्लंडसाठी अनेक कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळले.

याने तर वर्ल्ड कप जिंकवला

श्रीलंकेला 1996 साली वर्ल्ड कप जिंकून देणारा अर्जुना रणतुंगाचं वजन 115 किलो होतं.

127 किलो

बर्म्यडाच्या संघातून खेळलेल्या ड्वेन लेवरॉक 2007 मध्ये वर्ल्ड कप खेळला. त्याचं वजन तेव्हा 127 किलो होतं.

140 किलो वजन

वेस्ट इंडीजच्या संघातील रहकीम कार्नवालचं वजन 140 किलो असताना तो क्रिकेट खेळला आहे.

VIEW ALL

Read Next Story