भारत आणि आयर्लंडविरुद्धचा पहिला सामना न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी क्रिकेट स्टेडिअममध्ये खेळवण्यात आला

या सामन्यात मैदानात उतरताच रोहित शर्माने इतिहास रचला. एक अनोखा विक्रम रोहित शर्माने आपल्या नावावर केला आहे.

आतापर्यंत खेळवण्यात आलेल्या आयसीसीच्या सर्व टी20 वर्ल्ड कपमध्ये खेळणारा रोहित शर्मा हा जगातला पहिला खेळाडू ठरला आहे.

37 वर्षांचा रोहित शर्माने टी20 वर्ल्ड कपमध्ये 19 सप्टेंबर 2007 मध्ये इंग्लंडविरुद्ध पदार्पण केलं.

पण त्याला फलंदाजीची संधी 20 सप्टेंबर 2007 मध्ये मिळाली. रोहितने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 16 चेंडूत 30 धावा केल्या. या जोरावर भारताने सेमीफायनल गाठली होती.

रोहित यानंतर 2009, 2010, 2012, 2014, 2016, 2021, 2022 अशा सर्व टी20 वर्ल्ड कपमध्ये खेळला. आता 2024 ही त्याची नववी टी20 वर्ल्ड कप स्पर्धा आहे.

यंदाच्या टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत रोहित शर्मा भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व करतोय. आयसीसी जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचा रोहितचा प्रयत्न असेल.

VIEW ALL

Read Next Story