पाकिस्तानला धूळ चारणारा; भारतीय संघाशी नातं असणारा अमेरिकेचा 'हा' गोलंदाज ओळखला?

आश्चर्य

पाकविरोधातील सामन्यात चार षटकांमध्ये 18 धावा देणाऱ्या सौरभनं या सामन्यात दोन गडी बाद केले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हा खेळाडू कधी एकेकाळी अंडर 19 वर्ल्डकपमध्येही खेळला होता. पण, पुढे उत्तम संधीसाठी त्यानं अमेरिकेची साथ घेतली.

गोलंदाज

डावखुरा मध्यमगती गोलंदाज सौरभ नेत्रावलकर याचा जन्म 1991 मध्ये मुंबईत झाला होता. 2008-09 मध्ये त्यानं कूच बेहर चषकामध्ये 6 सामन्यांत 30 गडी बाद केले होते. ज्यामुळं त्याची निवड अंडर 19 वर्ल्डकपमध्ये होऊ शकली.

अंडर-19 वर्ल्ड कप

2019 मध्ये सौरभ- केएल राहुल, जयदेव उनाडकट आणि मयंक अग्रवाल यांच्यासोबतही खेळला. अंडर-19 वर्ल्ड कप 2010 मध्ये त्यानं 6 सामन्यांत 9 गडी बाद करत 25 धावा देत कमाल खेळाचं प्रदर्शन केलं. पण, सौरभव्यतिरिक्त इतर तिघांनी भारतीय संघाच्या सिनियर टीममध्ये स्थान मिळवलं.

चांगली संधी

सौरभनं पुढं क्रिकेट खेळणं सुरु ठेवलं. पण, एका चांगल्या संधीच्या शोधात अखेर त्यानं अमेरिकेची वाट धरली जिथं त्यानं अमेरिकेच्या क्रिकेट संघाचं नेतृत्वंही केलं.

भारतीय क्रिकेट

संधीच्या शोधात म्हणून देशाबाहेर गेलेल्या आणि चांगल्या संधीवाटे पुन्हा भारतीय क्रिकेट रसिकांसमोर आलेल्या सौरभवं अमेरिकेच्या संघासाठी 48 एकदिवसीय आणि 29 टी20 सामने खेळले आहेत.

कारकिर्द

एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या नावे 78 विकेट आणि आणि टी20 मध्ये 29 विकेटची नोंद आहे. 32 धावा देत 5 गडी बाद करण्याची सर्वोत्तम कामगिरीसुद्धा त्याच्या नावे नमूद आहे.

VIEW ALL

Read Next Story