टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध पोर्ट ऑप स्पेन कसोटीत शानदार शतक झळकावलं

विराट कोहीलने 10 चौकारांच्या मदतीने 180 चेंडूत शतक पूर्ण केलं. कसोटी कारकिर्दीतलं त्याचं हे 29 वं शतक ठरलं आहे.

विशेष म्हणजे विराट कोहलीचा हा 500 वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. यात त्याने आतापर्यंत 76 शतकं केली आहेत.

मोठ्या कालावधीनंतर विराटने परदेशी मैदानावर शतक केलं आहे. 16 डिसेंबर 2018 विराटने परदेशात शेवटचं शतक केलं होतं.

आता तब्बल 1677 दिवस आणि 31 इनिंगनंतर विराटने परदेशातील शतकांचा दुष्काळ संपवला आहे

वेस्ट इंडिजविरुद्ध विराट कोहलीचं हे तिसरं कसोटी शतक ठरलं आहे. याआधी त्याने नार्थसाउंड कसोटीत 200 आणि राजकोट कसोटी 139 धाला केल्या होत्या.

विराटने कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज डॉन ब्रॅडमॅन यांच्या 29 शतकांशी बरोबरी केली आहे.

विराट कोहलीचं या वर्षातलं हे दुसरं कसोटी शतक आहे. याआधी त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटीत 186 धावा केल्या होत्या.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं सचिन तेंडुलकरच्या नावावर असून त्याने 51 शतकं केली आहेत.

500 व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक करणारा विराट कोहली हा पहिला फलंदाज ठरला आहे. याआधी एकाही खेळाडूला 50 धावाही करता आल्या नव्हत्या.

VIEW ALL

Read Next Story