भारतीय गोलंदाजांना ट्रेनिंग देणार मुंबईचा 'हा' दिग्गज?

Jul 22,2024


भारतीय क्रिकेट संघ 22 जुलैला श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना झाली. श्रीलंका दौऱ्यात टीम इंडिया तीन टी20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे.


श्रीलंका दौऱ्यापासून गौतम गंभीरचा भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ सुरु होणार आहे.


श्रीलंका दौऱ्यावर मुंबई संघाचा दिग्गज गोलंदाज साईराज बहुतुलेसुद्धा रवाना झाला. 51 वर्षांचा साईराज टीम इंडियातल्या गोलंदाजांना ट्रेनिंग देणार आहे.


श्रीलंका दौऱ्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मॉर्ने मॉर्केलला टीम इंडियाचा फुल टाईम गोलंदाज प्रशिक्षक नेमण्याची शक्यता आहे.


लेग-स्पिनर साईराज बहुतुले टीम इंडियासाठी दोन कसोटी आणि 8 एकदिवसीय सामने खेळलाय. यात त्याने 62 धावा आणि पाच विकेट घेण्याची कमाल केलीय.


साईराज बहुतुलेने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केलीय. साईराजने 188 प्रथम श्रेणी सामन्यात 630 विकेट घेतल्या आहेत. तर 6176 धावा त्याच्या नावावर आहेत.


रणजी ट्रॉफीत सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम साईराजच्या नावावर आहे. साईराजने रणजी ट्रॉफीत 405 विकेट घेतल्या आहेत. बिशन सिंह बेदी यांनी 403 विकेट घेतल्या आहेत.

VIEW ALL

Read Next Story