2007 साली साऊथ अफ्रिकामध्ये झालेल्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने ट्रॉफीवर नाव कोरलं होतं.
पाकिस्तानचा फायनलमध्ये पराभव केल्यानंतर टीम इंडियाने दणक्यात वर्ल्ड कपची ट्रॉफी जिंकवली होती.
2007 साली टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मुंबईकरांनी मोठ्या जल्लोषात टीम इंडियाचं स्वागत केलं होतं.
मरिन ड्राईव्हवर जंगी मिरवणूक काढण्यात आली होती. पियुष चावला, रॉबिन उथप्पा, दिनेश कार्तिक असे युवा खेळाडू संघात होते.
तसेच युसूफ पठाण, इरफान पठाण, गौतम गंभीर, हरभजन सिंग असे खेळाडू या संघाचे भाग होते.
तसेच सर्वात आकर्षणाचा विषय होता, टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये सहा सिक्स मारणारा युवराज सिंग..!
वाढवलेल्या केसांसह धोनीचा लुक देखील त्यावेळी विशेष चर्चेत होता. तर तसेच रोहित शर्मा देखील या संघाचा भाग होता.