भारतीय क्रिकेटच्या वनडे आणि टेस्ट संघाचा कर्णधार रोहित शर्मा रोहित शर्मा आज त्याचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. विस्फोटक फलंदाज असणाऱ्या रोहितने क्रिकेट जगतात काही असे रेकॉर्डस् नावावर केले जे मोडणं जवळपास अशक्यच आहेत.
रोहित शर्माने वनडे क्रिकेटमध्ये एका इनिंगमध्ये 264 धावा केल्या होत्या. यात त्याने 33 चौकार आणि 9 षटकार ठोकले. हा वनडे क्रिकेटमध्ये कोणत्याही फलंदाजाने केलेला सर्वाधिक स्कोअर आहे.
रोहित शर्मा हा एकमेव क्रिकेटर आहे ज्यांनी तीनवेळा वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावले.
2019 च्या वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माने 9 सामन्यात 5 वेळा शतकीय कामगिरी केली होती.
रोहित शर्माने टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम केला आहे. यामध्ये त्याने 35 बॉलमध्ये ठोकलेल्या सर्वात जलद शतकाचा सुद्धा समावेश आहे.
रोहित शर्माने सर्व फॉरमॅटमध्ये मिळून एकूण 637 षटकार ठोकले आहेत. याबाबत रोहितने ख्रिस गेलला सुद्धा मागे सोडलं आहे.
रोहित शर्माने आयसीसी वनडे स्पर्धेत एकूण 68 षटकार ठोकले असून यात वनडे वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी यांचा समावेश आहे.
रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 132 षटकार मारले असून हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्याही फलंदाजाने एकाच संघाविरुद्ध मारलेले सर्वाधिक षटकार आहेत.
रोहित शर्माने एका इनिंगमध्ये 264 धावा केल्या होत्या. यावेळी त्याने 33 चौकार ठोकले होते. आतापर्यंत कोणत्याही क्रिकेटरने एका इनिंगमध्ये मारलेले हे सर्वाधिक चौकार आहेत.
रोहित शर्मा हा वारंवार वर्षभरातील आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असतो.
रोहित शर्मा हा आतापर्यंत भारतीय संघासाठी सर्वाधिक सामन्यांमध्ये सलामी फलंदाजी करणारा फलंदाज आहे.